Rent Eco Cutlery Our Success Story

मागील बरेच दिवस स्वछ भारत अभियान प्लॅस्टीक बंदी आणि आमच्या ह्याच्या रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी चे पवना नदी स्वछता अभियान चालू झाल्या पासून घरी कोणता कार्यक्रम झाला किंवा बाहेर कोणत्या शुभकार्यालाच्या, वाढदिवसाच्या कार्यक्रमाला जेवणासाठी जाऊन आले की मन व्यतीत व्हायचं ते जेवणानंतर होत असलेल्या प्लास्टिक थर्माकोल च्या डिश आणि ग्लास चा कचरा पाहून…

खूप विचार केला जर प्रत्येक जण भारत देश स्वछ करण्यासाठी प्रयत्न करत आहे तर ह्या ही गोष्टी वर काम करावे लागेल..बराच विचार करताना घरात चर्चा करताना लक्षात आले की आपल्या जुन्या काळी केटरिंग कडून स्टीलची भांडी भाड्याने आणली जात असत पण काळाच्या ओघात आणि वेळेच्या अभावी ती स्वछ करणे आणणे पुसणे आणि परत देणे आणि त्यातही त्या भांड्याचे hyagene हा प्रश्नःन असतोच… एवढा वेळ सध्या कोणाकडे नाही आणि त्यामुळे सर्रास नाईलाजाने प्लॅस्टीक आणि थर्माकोल असे घातक गोष्टी वापरल्या जात आहेत…

बर प्लॉब्लेम तर समजला पण सोडायचा कसा लोकांना च्या अडचणींवर मात कशी करायची ह्या वर विचार चालू केला मन काही स्वस्थ बसत नव्हते…

पवना नदी स्वछता करण्यासाठी वाहून घेतलेल्या आमच्या ह्याच्या बरोबर चर्चा करून उपाय सापडला.…ज्या गोष्टी च्या अडचणी मुळे लोक स्टीलची भांडी भाड्याने घेत नाहीत त्या सर्व अडचणी आपण सोडवायच्या आणि त्यांना सुखकर घरपोच स्वछ सुंदर चकाकणार्या #hygene अशी भांडी पुरवायची… कोणाकडे काकार्यक्रमा नंतर भांडी धुण्यास आणि सुकवण्यास जागा नसेल तर आहे तशी भांडी घेऊन येऊन ती आपल्या कडे स्वछ करायची…

शिवाय त्यांना कापडी रुमाल ही पुरवायचे ज्याने करून पेपर नॅपकिन चा कागद वाचेल झाडे वाचतील..

मंग सुरवात केली वस्तूची जुळवाजुळव करायला एका स्वप्नाला गाठायला..आणि बघता बघता #Rent-Eco-Cutlery ह्या संकल्पनेने आकार घेतला अनेकांना ती अल्पावधीत आवडली ही आज ह्या माध्यमातून स्वछ भारत अभियानात शहरासाठी काहीतरी करू शकत आहे ह्याच समाधान आहे.

– स्वछ चकाकणारी भांडी जी आमच्या बाजूला प्रत्येक वेळी पर्यावरण पूरक liquid वापरून घासून पुसून वाळवून ठेवव्याची काळजी घेतली जाते.
– घरपोच सुविधा
– स्वछ कापडी नॅपकिन

नक्कीच तुम्ही माझ्या ह्या संकल्पनेला साथ दयाल. तुमच्या घरात कोणतेही मंगल कार्य असेल तर नक्की संपर्क करा स्वछ सुंदर भांडी घरी येतील.

सध्या हा प्रकल्प पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये बाणेर, पाषाण, चिंचवड, वाकड, पिंपळे सौदागर, कोथरूड, रावेत, राहाटणी, निगडी, चिंचवड, पिंपरी, सांगवी आदी भागात सुरू केला आहे… लवकरच शहराच्या सर्व भागात आणि महाराष्ट्रातील इतर शहरात ही चालू करण्याच प्रयत्न करत आहे..

For More Details Reach us at  :

GreenishORA | 8605014087
greenishora@gmail.com | www.greenishora.com
https://www.facebook.com/RentEcoCutlery

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may use these HTML tags and attributes:

<a href="" title=""> <abbr title=""> <acronym title=""> <b> <blockquote cite=""> <cite> <code> <del datetime=""> <em> <i> <q cite=""> <s> <strike> <strong>